खारेपाटण (प्रतिनिधी) : गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कणकवली तालुक्याची सर्वसाधारण सभा नुकतीच दि.३० एप्रिल २०२६ रोजी कणकवली पोलिस ठाणे येथे संपन्न झाली. या सभेमध्ये संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते पोलिस पाटील उदय सावंत यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी विश्वास सावंत आणि उपाध्यक्षपदी नारायण गावकर यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
गाव कामगार म्हणून ओळख असलेल्या पोलिस पाटील यांच्या कणकवली तालुका संघटनेची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे —
अध्यक्ष – उदय सावंत, उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव – विश्वास सावंत, सह सचिव – विनोद शेलार, खजिनदार – गणेश वाळके, सह खजिनदार – श्रेया जंगले यांची निवड करण्यात आली असून बशीर शेख, संजना आंगणे, सुशील तांबे, दिशा सावंत, योगेश चव्हाण, मृणाली चव्हाण, योगेश कदम, रिद्धी मुणगेकर, जितेंद्र मण्यार, दिगंबर भालेकर, नामदेव राणे, रवींद्र जाधव, स्वाती पाताडे, संदीप कदम, रिया नाईक, मयूर ठाकूर आदी प्रमुख पोलिस पाटील यावेळी उपस्थित होते.
कणकवली पोलिस पाटील संघटनेच्या या नवीन कार्यकारणी निवडीच्या सभेला सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अध्यक्ष – उदय सावंत

उपाध्यक्ष – नारायण गावकर

सचिव – विश्वनाथ सावंत












