चिंदर गावठणवाडी येथे “देवा घरचा न्याय”‍ कौटुंबिक नाटक..!

चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळाच्या २१ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळ, चिंदर कार्यालयाचा २१ वा वर्धापन दिन सोहळा चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळ, चिंदर व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीवर्षाप्रमाणे बुधवार, दिनांक १४ मे, २०२५ रोजी संपन्न होत आहे.

त्यानिमित्त बुधवार दिनांक १४ मे, २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. श्री आकारी ब्राह्मण देवावर एकादशणी, सकाळी ०९.०० वा. कार्यालयात एकादशणी, सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १२.०० वा. : महाप्रसाद सायं. ०७.०० वा. स्थानिक मंडळाचे सुस्वर भजन,
रात्रौ १०.०० वा. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण, चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळ आयोजित कौंटुंबिक तीन अंकी नाटक “देवा घरचा न्याय” सादर होणार आहे. लेखक : दशरथ राणे, दिग्दर्शक दादू घाडी, निर्माता अरविंद घाडी व रावजी तावडे, संगीत – भाई तावडे, तबला – प्रथमेश तावडे, पार्श्वसंगीत प्रसाद घाडी व सागर परब, नेपथ्य प्रकाश योजना व ध्वनी संकलन शरद कांबळी, रंगभूषा जितू तिरोडकर, कलाकार – अशोक रेवडेकर, दिपक घाडी, प्रमोद घाडी, गिरीष पवार, अभय पाडावे, हर्षदा बागायतकर, सागर घाडी, अमोल घाडी, भूषण दत्तदास हे असून नाट्यप्रयोगाचा नाट्यरसिकांनी आनंद घ्यावा व भाविक भक्तांनी सत्यनारायण महापूजेच्या तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंदर गांवठणवाडी उन्नती मंडळ, चिंदर व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!