राज्‍यात सिंधुदुर्ग ने मारली बाजी ; सर्वाधिक ९९.३२ टक्‍के निकाल…

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी परीक्षेत दरवर्षी प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याने गुणवत्तेत आघाडी घेतली असून जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक ९९.३२ टक्के एवढा निकाल लावला आहे. तर वैभववाडी तालुक्यातील सर्व शाळांचा निकालही शंभर टक्के लागला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी ८८५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्षात ८८५० विद्यार्थी परीक्षेला बसले यात ८७९० जण उत्तीर्ण झाले. या निकालात मुलींची टक्केवारी ९९.४८ टक्के तर मुलांची टक्केवारी ९९.१७ टक्के राहिली.

तालुकानिहाय निकालामध्ये वैभववाडी १०० टक्के, सावंतवाडी ९९.७८ टक्के, दोडामार्ग ९९.७४ टक्के, वेंगुर्ले ९९.४१ टक्के, मालवण ९९.३९ टक्के, कणकवली ९९.२६ टक्के, कुडाळ ९९.१४ टक्के आणि देवगड ९८.५२ टक्के असा निकाल आहे.

error: Content is protected !!