मालवण (प्रतिनिधी) : मानवता विकास परिषद च्या वतीने मालवण भरड नाका येथील लीलांजली हॉल येथे 14 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव विविध उपक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे..
मालवण येथे छत्रपतीसंभाजी महाराज जयंती 14 मे रोजी..












