कणकवली (प्रतिनिधी) : ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेचे १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) २०२५ चा निकाल जाहीर झाला. आयडियलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले.
९०% च्या वरती ११ विद्यार्थी आहेत तर ३४ विद्यार्थी ८०% च्या वर आहेत. प्रथम, द्वितीय ,तृयीय आणि चतुर्थ क्रमांक खालीलप्रमाणे
प्रथम – कु. श्रावणी सतीश सामंत – 491/500 (98.20%)
द्वितीय – कु. वेद सचिन आरलेकर 476/500 (95.20%)
तृतीय – कु. हर्षिता अजित सावंत – 468/500 (93.60%)
चतुर्थ – कु.अमन अवदेश चौहान – 465/500 (93%)
चतुर्थ – कु.अनुज राजा घुगे – 465/500 (93%)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तयेशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलन्द पटेल, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा.निलेश महेंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी.पी. ताणवडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.













