ओराेस (प्रतिनिधी) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात १० एप्रिल २०२३ रोजी भूमापन दिन साजरा करण्यात येणार आहे. भूमापन दिनाचे औचित्य साधून भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अभिलेखांची प्रदर्शने ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर यांनी केले आहे.