भाजपा आमदार नितेश राणेंचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
कणकवली (प्रतिनिधी) : मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. खा संजय राऊत याना आलेली धमकी ही दारूच्या नशेत काही युवकांनी त्यांना पाठवलेला मेसेज होता हे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आलेल्या धमकीवरून 2 दिवस नाहक केलेला तमाशा महाराष्ट्राने बघितला. त्यामुळे संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणेंनी खा संजय राऊत यांच्यावर घणाघात केला. जेव्हा केंद्रीयमंत्री राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामना दैनिक कार्यालयाससमोर सभा घेतलेली तेव्हा हा संजय राऊत संडासात 4 तास लपून बसला होता. संजय राऊत याला ठार मारण्याची आलेली धमकी हा निव्वळ संजय राऊत यांचा पोलीस संरक्षण वाढवुन घेण्यासाठी बनाव होता. संजय राऊत , उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंग्विन हे डरपोक नामर्द असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला.