नांदगाव ग्रामस्थांचा संतप्त सवाल ; सर्व्हिस रोड अभावामुळे पुन्हा अपघात
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथील सर्विस रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या सर्विस रस्त्या अभावी आजपर्यंत छोटे-मोठे कित्येक अपघात झाले आहेत.आजही दुपारी एकच्या सुमारास नांदगाव ओटव फाटा ब्रिज संपते त्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मिडल कट दरम्यान डंपर व वॅगनार कार यांच्यात अपघात झाला. सुदैवाने किरकोळ जखमींवर निभावले.वॅगनार कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अजून किती अपघातांची वाट पाहणार असा संतप्त सवाल नांदगाव ग्रामस्थांमधून होत आहे.
डंपर व्यावसायिक हा कणकवली होऊन देवगडच्या दिशेने जाण्यासाठी नांदगाव हून एक साईट सर्विस रस्ता अद्याप ही नसल्याने नांदगाव ओटव फाटा ब्रिज संपते त्या ठिकाणी मिडल कट जवळ विरुद्ध दिशेला जात असताना मागोमागच येणाऱ्या वॅगनार कारने डंपरला मागवून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. संबंधित यंत्रणा अजून अशा अपघातांची किती वाट पाहणार ? असा सवाल नांदगाव वासियांमधून होत आहे.
सदर सर्विस रस्त्यावरील बांधकाम पोलीस बंदोबस्तामध्ये हटवले गेले आहे.याला आता दोन महीन्याचा कालावधी होईल.ज्यावेळी सर्विस रस्त्याच्या प्रश्नावर आंदोलन होत होते . तेव्हा तर संबंधित यंत्रणा म्हणत असे की, नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोड प्रश्न सुटत असेल तर आम्ही चार दिवसांत सर्व्हिस रोड वाहतूकीस सुरू करु .पण चार दिवस जाउंदे हो , पण निदान दोन महीने होत आले आहे .असे का होत आहे. नांदगाव पासून ते देवगड पर्यंत जाण्यासाठी सर्व वाहनांना विरुद्ध दिशेला जात वाहने न्यावी लागत आहे. याचा थोडा विचार करावा .असे सर्व सामान्य नागरिक म्हणू लागले आहेत.