नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी मिळणार सर्व प्रकारचा बॅकअप
आमदार नितेश राणेंनी केली घोषणा
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी मोठी घोषणा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कोकण भूमी टीबीआय फाउंडेशन या कोकणातील पहिल्या इंक्युबेशन सेंटर चे उदघाटन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेज येथे संस्थाध्यक्ष नीलम राणे, उपाध्यक्ष निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे इंक्युबेशन सेंटर भारत सरकार मान्यताप्राप्त असून एम एस एम इ च्या विभागांतर्गत होस्ट इंक्युबेशन म्हणून नोंदनिकृत आहे.नवीन बिजनेस साठी लागणाऱ्या सर्व सुविधा या सेंटरमध्ये असणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यासह कोकणातील सर्व नवीन उद्योजकानी लाभ घेण्याचे आवाहन आमदार नितेश राणेंनी केले. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा सर्व प्रकारचा बॅक अप या सेंटरमध्ये असणार आहे.