मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष

जाब विचारण्यासाठी २१ मे २०२५ रोजी कणकवली शासकीय विश्रामगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा नजिक येऊनसुध्दा अपूर्ण आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याने पहिल्याच पावसाने सगळे दावे फोल ठरले आहेत. याबाबत संबंधित यंत्रणांना जाब विचारण्यासाठी आणि त्याबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी महामार्गालगतच्या गावांचे सर्व सरपंच, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची विशेष बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी सकाळी ठिक १०.३० आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा नजिक येऊनसुध्दा अपूर्णावस्थेत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करूनही सर्व कामे अपूर्णच आहेत. तरी याबाबत उपाययोजना होऊन ठोस कार्यवाहीसाठी महामार्गालगतच्या गावांचे सर्व सरपंच, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची विशेष बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने महामार्गावरील लगतच्या त्या-त्या गावच्या विविध समस्या सोडविण्यासाठी चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तरी याबाबत तातडीने उपाययोजना होऊन ठोस कार्यवाहीसाठी महामार्गालगतच्या गावांचे सर्व सरपंच, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड.नंदन वेंगुर्लेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सहकार्यवाह व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सचिव चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी केले आहे.

error: Content is protected !!