साई भंडारा व श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य
आचरा (प्रतिनिधी) : साई मंदिर चिंदर बाजार येथे मंगळवार 20 मे 2025 रोजी साई भंडारा व सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त सकाळी 8 वा. साईंच्या मूर्तीवर लघुरुद्र, सकाळी 10 वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 ते 3 वा. तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं 7 वा. स्थानिक भजने, रात्री 10 वा. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा ट्रिकसीन युक्त दशावतार नाट्य प्रयोग “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात श्री वेतोबाच्या भूमिकेत लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर काम करणार असून भाविक भक्तांनी तीर्थ प्रसाद, महाप्रसाद याचा लाभ घ्यावा व नाट्य प्रेमिनी दशावतार नाट्य प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन साई सेवा समिती चिंदर बाजार यांच्यावतीने करण्यात आले आहे.












