कोल्हापूर प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कर्नाटकातून एका टेम्पोतून गुटखा घेऊन एक जण पुणे – बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कोल्हापूर – सांगली मार्गावर बेकायदेशीर रित्या गुटखा वाहतुक करणाऱ्या रवींद्र वसंत पाटील याला ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक टेम्पो असा आठ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे, अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, राजू कांबळे, शिवानंद मठपती, गजानन गुरव, अरविंद पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, अमित सर्जे यांनी मिळून केली आहे.












