वाढदिवस सेलिब्रेशन टाळत जपली सामाजिक बांधिलकी
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धश्रमांत आपला वाढदिवस साजरा केला. युवा उद्योजक अचित कदम नेहमीच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात पदरमोड करून जनसेवा करतात. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाजातील वंचित घटकाला आवश्यक असलेले सहकार्य करणे यातच खरे समाधान असल्याचे अचित मानतात. याच भावनेने दरवर्षी वाढदिवस वृधश्रमात साजरा करतो असे अचित कदम म्हणाले.कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील संविता आश्रम मध्ये जात अचित कदम यांनी जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. यावेळी दिविजा वृद्धाश्रम चे संचालक संदेश शेट्ये यांनी अचित कदम यांचे आभार मानले. तसेच संविता आश्रम मध्येही अचित कदम यांनी जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या. संविता आश्रम च्या वतीने किसन भाऊ चावरे यांनी कदम यांचे आभार मानले. यावेळी अचित कदम यांच्यासोबत कान्हा मालंडकर,प्रदीप कदम, सोहेल खान, सागर राणे उपस्थित होते.











