१०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ
चौके (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या योजने अंतर्गत मालवण तालुक्यातील गोळवण धवडकी वाडी येथे ग्रामपंचायत सदस्य साबाजी गावडे यांच्या जमिनीत आज वृक्षारोपण करून १०० वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य साबाजी गावडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी करुणा राणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, कर्मचारी करुणा राणे, प्रसाद परब आदि जण उपस्थित होते.














