जागतिक पर्यावरण दिनानिमित

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण

खारेपाटण (प्रतिनिधी) : ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत आवारात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, सामजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, ग्रामस्थ सूर्यकांत गुरव, संदेश चिके व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी वणओषधी झाडांच्या रोपांची लागवड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.पर्यावरणाचा समतोल राखयचा असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. व त्याचे संवर्धन केले पाहिजे.असा संदेश यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांनी ग्रामस्थांना दिला. तर उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!