क्रांतीज्योत ग्रामसंघ खारेपाटण यांच्या माध्यमातून
प्रा.आ.केंद्र व ग्रा पं.खारेपाटण चे आयोजन
७५ महिलांनी घेतला आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रंतिज्योत ग्राम संघ खारेपाटण यांच्यावतीने व खारेपाटण ग्रामपंचायत आणि खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने पंचशील नगर खारेपाटण येथील अंगणवाडी केंद्र येथे नुकतेच ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक१ मधील पुरुष व महिलांसाठी एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरात सुमारे ७५ महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या उद्घघाटन कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,ग्रा पं.सदस्य किरण कर्ले,खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.निलोफर जमादार,स्थानिक संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्षा तथा अशा स्वयंसेविका गट प्रवर्तक संकिता पाटणकर क्रांतीज्योत ग्रामसंघाच्या अध्यक्ष जागृती पोटले,सचिव वृषाली दर्पे, महिला बचत गटाच्या सीआपी सौ सायली तुरळकर,प्रा.आ केंद्राच्या सी एच ओ स्नेहा जाधव,आरोग्य सहायक के एस वानोळे,आरोग्य सेवक मिथुन गेडाम,आरोग्य सेविका लक्ष्मी करोड,स्टाफ नर्स श्रीम प्राजक्ता कारोटे,लॅब असिस्टंट श्रीम माळवदे,महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आस्था पाटणकर, अंगणवाडी सेविका सविता पाटणकर,आशा स्वयंसेविका माधवी कांबळी,शिल्पा मेस्त्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे क्रांतीज्योत ग्रामसंघाच्या अध्यक्ष जागृती पोटले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना आरोग्य विषयी काळजी घेण्याचे आवाहन करत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला शुभेछा दिल्या.तर खारेपाटण प्रा.आ केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ निलोफर जमादार यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी व साथ रोगाबद्दल सतर्कता कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात महिलांची ई सी जी,शुगर तपासणी,रक्तदाब तपासणी,तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले.तर आस्था पाटणकर यांनी आभार मानले.












