ओरोस येथील डाएट संस्थेच्या आवारात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा : ७९ प्रशिक्षणार्थीची उपस्थिती

तळेरे (प्रतिनिधी) : मानव आणि निसर्ग यांचे अतुट संबंध प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत,त्यामुळे निसर्ग हा मानवाचा गुरु आहे, बहारदार वृक्षामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून आहे. झाडे वाचली तर पर्यावरणाचे म्हणजेच निर्सगाचे संतुलन बिघडणार नाही, त्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग -ओरोस अर्थात डाएट आवारात जिल्ह्यातील ७९ शिक्षक प्रशिक्षणार्थींनी ‘एक पेड मॉ के नाम’ अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करून’ झाडे लावा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.याप्रसंगी डाएटचे अधिव्याख्याता डॉ. पवार यांच्या शुभहस्ते सागाचे रोप लावण्यात आले. याप्रसंगी निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी उपस्थित ७९ प्रशिक्षणार्थी शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

error: Content is protected !!