७९ माध्य- व उच्च माध्यमिक शिक्षकांची हजेरी
तळेरे (प्रतिनिधी) : शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग अर्थात डायट येथे निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणाचा प्रारंभ डाएटचे प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे यांच्या उपस्थितीत झाला.याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या समन्वयक स्मिता जाधव,अधिव्याख्याता नागेश कदम,संदीप पवार,परब,दिगंबर सारंग,राजाध्यक्ष, तन्वी आपटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डायट ओरोस येथील प्रशिक्षण केंद्रावर निवड श्रेणीसाठी २१ तर वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी ५८ प्रशिणार्थी दि २ जूनपासून ते दि १२ जूनपर्यंत १० दिवस प्रशिक्षण घेणार आहेत. उपस्थित मान्यवरांचे व प्रशिक्षणार्थीचे स्वागत केंद्रसमन्वयक श्रीम स्मिता जाधव यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना १० दिवसाच्या कालावधीतील प्रशिक्षण संदर्भात सूचना देऊन प्रशिक्षणाला शुभेच्छा दिल्या.तर उद्घाटन सोहळ्याचे श्रीम.राजाध्यक्ष यांनी आभार मानले.











