पॉल टेलर्स चे मालक पॉल फर्नांडिस यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठ येथील पॉल टेलर्स चे मालक आणि वरवडे फणसनगर येथील रहिवासी पॉल रॉकी फर्नांडिस ( वय 91 ) यांचे रविवार 8 जून रोजी सकाळी राहत्या घरात वृद्धत्वाने निधन झाले. जुन्या पिढीतील ख्यातनाम टेलर असलेले पॉल फर्नांडिस यांनी सन 1967 साली कणकवली बाजारपेठेत टेलरिंग व्यवसायाला सुरुवात केली होती.

त्यांच्या पश्चत पत्नी, दोन विवाहित मुलगे, 3 विवाहित मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. पॉल यांच्या मृतदेहावर सोमवार 9 जून रोजी सकाळी वरवडे फणसनगर येथील सिमित्रीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पॉल फर्नांडिस यांच्या निधनाने कणकवली बाजारपेठ आणि वरवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!