तळेरे (प्रतिनिधी) : आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती श्री स्वामी समर्थ उपासना मठ, दारुम-गावडेवाडी येथे मठाच्या परिसरात विविध प्रकारच्या चाळीस फूल झाडे, फळ झाडांचे वृक्षारोपन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मठाचे उपाध्यक्ष राजेंद्र तळेकर, सचिव राजू जठार, खजिनदार प्रविण पोकळे, विश्वस्त भरत चव्हाण, राजेंद्र सावंत, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, प्राध्यापक विनायक पाताडे, प्रविण वरुणकर, अमित सावंत, विनोद वारीक, गणपत पेडणेकर, मंगेश पेडणेकर आदी स्वामी भक्त उपस्थित होते.
याप्रसंगी तळेरे येथील निसर्ग मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. या वृक्षारोपण उपक्रमाला तळेरे येथील शितल नर्सरीचे संचालक संजय राणे यांनी विविध प्रकारची फूलं झाडे आणि फळ झाडांची ४० रोपे मोफत उपलब्ध करून दिली. तसेच खत विक्रेते मच्छींद्र रेपे यांनी दोन सेंद्रिय खताच्या पिशव्या मोफत दिल्या.












