शिक्षकांवर लष्करी शिस्त लादणाऱ्या व असंवेदनशील वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा— ज. मो. अभ्यंकर

तळेरे (प्रतिनिधी) : वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी रत्नागिरी येथे वेगाने जाणाऱ्या शिक्षकांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे प्रशिक्षणस्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी झालेली घाई. प्रशिक्षणा साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे (MSCERT) प्रमुख राहुल रेखावार यांनी दाखवलेली असंवेदनशीलता आणि कठोर धोरण शिक्षकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त करणारे आहे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आम. ज.मो अभ्यकरण यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रशिक्षणासाठी काही मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणास अनुपस्थित म्हणून नोंदवले गेले. पहिल्याच दिवशी गावावरून, परराज्यातून धावपळ करत प्रशिक्षणासाठी पाच मिनिटे उशीर झालेल्या शिक्षकांना तुम्हाला प्रशिक्षण करता येणार नाही असे सांगण्यात आले, व त्यांना घरी पाठवण्यात आले. प्रशिक्षणात वेळेवर उपस्थित राहूनही गर्दीमुळे वेळेत सही न करता आलेल्या शिक्षकांनाही प्रशिक्षणास मुकावे लागले. एका शिक्षकास प्रशिक्षणादरम्यान प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर राहण्याची विनंती केली, परंतु त्यालाही परवानगी नाकारण्यात आली. यामुळे शेकडो शिक्षकांना प्रशिक्षणास मुकावे लागले. ही बाब अत्यंत निंदनीय असून, शिक्षकांवर अविश्वास दाखवणारी आणि शिक्षण प्रक्रियेत लष्करी शिस्त आणणारी आहे. सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी वारंवार विनंती करूनही आपला हट्ट कायम ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला संवेदनशीलता असू नये ही खेदाची बाब आहे.

“शिक्षक हे शिस्तप्रिय असतातच, पण त्यांच्यावर अशी संशयाची नजर आणि अमानवी धोरणे लादणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यांना धोका निर्माण करणं आहे. नियमांची कडक अंमलबजावणी करणं म्हणजे शिक्षकांच्या भावनांशी खेळ करणं होय. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”

राज्य सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण राबवण्याच्या पद्धतीमध्ये अनेकांचे आक्षेप आहेत. त्याचा विचार करून लवचिक धोरण अमलात यावयास हवे. ज्या शिक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांना पुन्हा प्रशिक्षणात सामील करून घ्यावे. शिक्षण खात्यात शिक्षणावर, शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर विश्वास असणारे, संवेदनशील अधिकारी कार्यरत असावेत.

error: Content is protected !!