विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे

संदीप मेस्त्री यांचे आवाहन : कलमठ गावातील यशवंतांचा संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : दहावी व बारावीच्या परीक्षसह अन्य स्पर्धामध्ये कलमठ गावातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपल्या कुटुंबांसह गावाचे नाव रोशन केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पुस्तकीज्ञानाबरोबर इतरत्र ज्ञान आत्मसात केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे, असे आवाहन भाजपच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले.

दहावी, बारावीच्या परीक्षेसह अन्य स्पर्धांमध्ये यशसंपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सचिन खोचरे, शिक्षिक किशोर कदम , आबा कोरगावकर, समीर ठाकूर, समीर कवठणकर, बाबू हिंदळेकर, मनोज जाधव, राकेश पावसकर, प्रथमेश धुमाळे, पंकज कदम,जयेश मेस्त्री, सचिन बागेश्री, विराज मेस्त्री आदी उपस्थित होते. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला.

error: Content is protected !!