मालवण दिवाणी न्यायालय वकील कक्षात शिवराज्याभिषेक दिन साजरा

चौके (प्रतिनिधी) : मालवण दिवाणी न्यायालय वकील कक्षामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मालवण तालुका बार असो. चे अध्यक्ष धामापुरकर, उपाध्यक्ष सुकाळे, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरकर, मालवण अधिवक्ता परिषद अध्यक्ष प्रदीप मिठबावकर, ज्येष्ठ अधिवक्ता समीर गवाणकर, हेमेंद्र गोवेकर, हर्षद तरवडकर, हरेश्वर गरगटे, अक्षय पवार, अविनाश पाटकर, अमेय कुलकर्णी, प्रथमेश सावंत, रश्मी मोंडकर, लता कुबल मोंडकर, शिल्पा टिळक, आणि अन्य अभिवक्ता उपस्थित होते.
यावेळी अधिवक्ता समीर गवाणकर, सतीश कुमार धामापूरकर आणि प्रदीप मिठबावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिवक्ता प्रथमेश सामंत यांनी केले तर आभार प्रदीप मीठबावकर यांनी मानले.

error: Content is protected !!