कणकवली (प्रतिनिधी) : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे प्राध्यापक श्री. रविंद्र गोविंद पाटील (वय- ५६) यांचे आज ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने -निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गावचे मूळ रहिवासी असलेले पाटील सर कलमठ महाजनी नगर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. एस.एम. हायस्कुल च्या मराठी विषयाच्या प्राध्यापक मनिषा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या निधनाने पाटील परिवार, एस्. एम्. हायस्कूल, कणकवली वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एस्. एम्. हायस्कूलचे प्रा. आर. जी. पाटील यांचे निधन












