पेठवडगाव येथील निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणच्या सांगता समारंभात प्रतिपादन
पेठवडगाव (प्रतिनिधी) : एकाच वेतनश्रेणीत सलग 24 वर्ष पूर्ण सेवा केलेल्या सर्व शिक्षकांना सरसकट निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा,
याशिवाय क्रीडा शिक्षकांना विशेष शिक्षकांचा दर्जा देऊन प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक भरला जावा अशी मागणी आपण येत्या विधिमंडळाच्या बैठकीत करणार आहोत असे आश्वासन पुणे विभागाचे शिक्षक आम. प्रा.जयंत आसगावकर यांनी पेठवडगाव येथ कला व क्रीडा शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी विभागीय प्रशिक्षणात दिले.
कोल्हापूर डाएटच्यावतीने दि.१० जून ते १२ जून या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात शिक्षक आम.आसगावकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.तर निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोल्हापूर डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता महादेव वाडंरे यांनी भुषविले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर आदर्श गुरुकुल विद्यालय शिक्षणसंकुलाचे संस्थापक अध्यक्ष डी.एस.घुगरे,संस्था सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.एम.डी.घुगरे, आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगाव प्रशिक्षण केंद्राचे सुलभक तथा किणी विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर,कोल्हापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा सुलभक अनिल पाटील,गडहिंग्लज हायस्कूलचे पर्यवेक्षक तथा सुलभक वैजनाथ पालेकर, सुळे माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक तथा सुलभक संतोष फिरंगे व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी बाबा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आम.जयंत आसगावकर पुढे म्हणाले की, सदरचे प्रशिक्षण हे उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षण असल्याने या प्रशिक्षणाचा कालावधी अर्जित रजेत रूपांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी हमी दिली.दरम्यान यावेळी अधिव्याख्याता महादेव वाडंरे, सुलभक पांडुरंग मोहनगेकर,अनिल पाटील, वैजनाथ पालेकर,व संतोष फिरंगे आदींनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
तर प्रशिक्षणार्थ्यांच्यावतीने अजय शिंदे व अन्य प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक गटाच्या सुलभकांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी राजेंद्रकुमार जगदाळे,मोहन वीरकर व अन्य प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करून तीन दिवसीय प्रशिक्षणाचा अनुभव कथन केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वाघमोडे यांनी तर आभार दत्तात्रय मारकड यांनी आभार मानून प्रशिक्षणाची सांगता केली. याशिवाय या तीन दिवसीय प्रशिक्षण केंद्राला कोल्हापूर डाएटचे प्राचार्य डॉ.श्री.भुई,शिक्षक नेते दादासाहेब लाड आदींनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यींना विशेष मार्गदर्शन केले.या ठिकाणी कोल्हापूर विभागातील कला शिक्षकांचे ही प्रशिक्षण संपन्न झाले











