त्रिंबक उपसरपंचपदी सुचिता एकनाथ घाडीगावकर यांची बिनविरोध निवड..!

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सुचिता घाडीगावकर यांचे केले अभिनंदन

आचरा (प्रतिनिधी) : सुचिता एकनाथ घाडीगावकर यांची त्रिंबक उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच किशोर त्रिंबकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सुचिता घाडीगावकर यांचे यावेळी अभिनंदन केले आहे. यावेळी अशोक बागवे, संतोष गावकर, शेखर मेस्त्री, संतोषी सावंत, नेहा वेंगुर्लेकर, आशू बागवे, सागर चव्हाण, रोहित त्रिंबकर, ज्योती तेली, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!