दाे़डामार्ग (प्रतिनिधी) : गेले तीन चार महिने संजय गांधी पेन्शन न मिळाल्याने जिला कोणाचाच आधार नाही अशा कोलझर येथील महिला अन्नपूर्णा देसाई हिची उपास मारीची वेळ आली.तेव्हा तहानेल्याला पाणी द्यावं, भुकेलेल्याला अन्न द्यावं या ब्रिद वाक्या नुसार कोलझर उपसरपंच समिधा गवस यांनी व त्याचे पती समीर गवस यांनी या निराधार महिलेचा आधार बनून पूर्ण एक महिना सकाळ चे नास्ता, दुपारी व रात्री च्या जेवणाची सोय केली. याबद्दल साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर -दोडामार्ग चे अध्यक्ष साबाजी सावंत व संघटनेचे सर्व संचालक यांनी याचे आभार मानले.
त्या निराधार महिलेच्या आधार बनल्या कोलझर च्या उपसरपंच समिधा समीर गवस











