राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी तालुका अध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी भालचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी जाधव यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे.

भालचंद्र जाधव हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. सध्या वैभववाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नासाठी उपोषण, आंदोलन करून प्रशासनाचे लक्षवेधण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामांची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशावरून त्यांची वैभववाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.जाधव यांच्या सारख्या होतकरू तरुण कार्यकर्त्यांला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडताना सर्व जुने, नवीन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करू. वैभववाडी तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने काम करून तालुक्यात पुन्हा कॉग्रेसला गतवैभव मिळवून देऊ. असा विश्वास त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!