सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याच उपस्थितीत सोमवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चा उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनिय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे.
सदर ‘स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रम आराध्या हॉटेल, झाराप झिरो पॉईन्ट,नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ,येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री,रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री. आनंदराव अडसुळ,अध्यक्ष – गोवा बागायतदार संघ नरेंद्र सावईकर,अध्यक्षा जिजाई महिला सेवा संस्था ओसरगांव नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली,जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.













