पडेल सरपंच भूषण पोकळे यांची वचनपूर्ती

सरपंच निवडणूक जाहीरनाम्यातील कामांचा केला शुभारंभ

खारभूमी योजनेंतर्गत एकूण 78 लाख 75 हजारांच्या कामाला सुरुवात

देवगड (प्रतिनिधी) : सरपंच निवडणुकीत ग्रामस्थांना दिलेला जाहीरनामा हा केवळ आश्वासनांपुरता नव्हता तर त्याची वचनपूर्ती आज प्रत्यक्ष करत आहोत.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पडेल गावातील सर्व विकासकामे मार्गी लावणार असल्याचे पडेल गावचे लोकनियुक्त सरपंच भूषण पोकळे यांनी सांगितले. खारभुमी योजने अंतर्गत पडेल क्र.1 (बौद्धवाडी) येथील उघाडी चे नूतनीकरण कामाच्या 38 लाख 45 हजार 362 रु निधी असलेल्या आणि पडेल क्र.2 (शिवडीवाडी) खारबंधारा उघाडी(दरवाजा) च्या 35 लाख 29 हजार 925 रुपये निधी मिळालेल्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन पडेल गावचे सरपंच श्री भुषण रा.पोकळे व माजी उपसभापती श्री. रवी तिर्लोटकर यांच्या हस्ते झाले सरपंच श्री भुषण पोकळे यांनी निवडणुकीच्या जाहीरनामा मध्ये हे काम करणार याची ग्वाही गावाला दिली होती. त्याचा पाठपुरावा करून आज वचनपूर्ती केली. माजी उपसभापती श्री.रविंद्र तिर्लोटकर यांनी पाठपुरावा करत संपूर्ण मार्गर्शन केले त्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे.

यावेळी पडेल गावचे उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रा पं सदस्य प्रभाकर वाडेकर सिद्धेश पाटणकर ,राजदीप वारीक, समीर हेमले, शरयु अनभवणे, सानिका तानवडे, प्रतिक्षा माळगवे, अर्पिता पाटणकर,अदिती तानवडे,भा ज पा शक्ती प्रमुख अंकुश ठुकरुल,कृषीमित्र रोजगार सेवक विनायक चव्हाण, श्री सुहास बोडस, काशीराम वारीक, सदा कुळकर,दयाराम माळगवे,अरुण वारीक, जिजी माळगवे, अनंत मोंडे, सुरेश देवळेकर,सतीश ठुकरुल,परशुराम माळगवे ,विठ्ठल पडेलकर, अतुल पडेलकर, जयराम शेठ वारीक , कृष्णा लाखन,बाळा वारीक, बाळा पडेलकर,हर्षनंदन पडेलकर,राजन पडेलकर,उत्तम पडेलकर, सिद्धार्थ पडेलकर मंगेश पडेलकर,यशवंत देवरुखर,अनंत मशिये आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!