वैभववाडी तालुका शिवसेना-युवासेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजन

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख संदीप कदम याची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेनेच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील इयत्ता १० वी १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच वैभववाडी तालुक्यातील प्रशाळेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या वतीने भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख संदीप कदम यांच्या हस्ते उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १० वी १२ वी नंतर कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांनमधून मुलांनी कोणती शाखा निवडावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त मुलांनी स्टेनो, आय टी आय मुलींनी नर्सिंग कोर्स करावा असे यावेळी सतीश सावंत यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, प्रथमतः उपस्थित १० वी १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आपण शैक्षणिक क्षेत्रातला पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलात. सिंधुदुर्ग जिल्हा हा गेली कित्येक वर्षे हा १० वी १२ वी निकालात अव्वल टक्केवारी मिळवण्याचा विक्रम करत आहे. १० वी १२ वी नंतर योग्य तो मार्ग निवडून आपले आयुष्य उज्ज्वल करा व आपल्या नावासोबत आपल्या तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव देखील उज्ज्वल करा.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, महाराष्ट्राचे युवानेतृत्व मा. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम यां ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आपला हा सन्मान करत असल्याचे नाईक म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप कदम महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी देखील उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. उपस्थित शिक्षक वर्गामधून देखील शिक्षकांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, दिव्या पाचकुडे, नगरसेवक बंडू सावंत, जावेद शेख, गुलझार काझी, सरपंच जितू तळेकर, रवींद्र रावराणे, विशाल जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!