१४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवसा निमित्त रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळा वैभववाडीत संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : १४ जून २०२५ रोजी जागतिक रक्तदाता दिना निमित्त आरोग्य केंद्र वैभववाडी येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील अनेकजण या शिबिरात सहभागी झाले होत. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रशांत धनाजी गुळेकर पदाधिकारी प्रशांत कुळये, सचिन रावराणे,परब सर, दिनकर केळकर सर, महेश संसारे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ , भैय्या कदम कादर फरास,संजय गुरखे प्रशांत लाड, श्रीधर साळुंखे, सुवर्णा संसारे, कांबळे मॅडम, अनंत चव्हाण, मधुकर पाटील, अमोल दळवी, अमित चव्हाण, होळकर, रविंद्र पवार, शांतनू बांदिवडेकर, प्रियांका बांदिवडेकर , राजेंद्र पाटील, राहुल गावडे, राहुल अस्पतवार, संदीप गोरे, उत्तम खोपकर, उत्तम पनोगेकर, शारदा आंबेरकर , किर्ती आंबेरकर, अक्षय खेडेकर उपस्थित होते.

जागतिक रक्तदाता निमित्ताने रोटरी क्लब ऑफ वैभववाडी, शिव शंभो प्रतिष्ठान करुळ, उंबर्डे ग्रामस्थ तरूण मंडळ उंबर्डे, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ वैभववाडी, शिव प्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) , सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र मागवली, एकदंत फुड ॲण्ड वेव्हरेजिस गडमठ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघ वैभववाडी या सर्वांचा विशेष सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी ४२ वेळा रक्त दान केले म्हणून सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठाने विशेष सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर जिवन धारा ब्लड बँक चे नयन मोरे व त्यांच्या टिमने सहकार्य केले. जागतिक रक्तदाता दिवस यशस्वी होण्यासाठी डॉ. अर्जुन एन नरोटे व सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!