वैभववाडीचे निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील रहाणार उपस्थित
वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर उद्या सोमवार दि.१६ जून पासून शैक्षणिक वर्ष २५-२६ ला सुरवात होत आहे. पुन्हा एकदा सर्व शाळांचा परिसर गजबजणार आहे. सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी या शाळेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी ने प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व बुट वाटप, औदुंबर सेवा ट्रस्ट यांच्या वतीने मोफत वह्या वाटप, संजय शिंदे यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप, खाऊ वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला निवासी नायब तहसिलदार दिलीप पाटील उपस्थित रहाणार आहेत. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन उच्च श्रेणी मुख्याध्यापक संजय पाताडे, शाळा व्यवस्थापन समितीचे गोपाळ कोकाटे, बाळकृष्ण कोकाटे, श्रीपाद उर्फ बाप्पी मांजरेकर यांनी केले आहे.













