आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने गणित विषयाची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. गणित संबोध , गणित प्राविण्य आणि तिसरा टप्पा गणित प्रज्ञा. अतिश कठिण व प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडी च्या कु. सान्वी विष्णू कुबल ( इयत्ता ५ वी ) हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे. तसेच राज्यस्तरीय प्रज्ञावान विद्यार्थ्याच्या यादीत स्थान पटकावले आहे.
या यशस्वीतेसाठी व शाळेच्या नावलौकिक वाढविल्याबद्दल कु.सान्वी कुबल व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक समीर चव्हाण यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्ष पूर्वा तारी यांनी व पालकांनी अभिनंदन केले आहे.











