विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी शाळेचा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न

नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर आज सोमवारी दि.१६ जून पासून शैक्षणिक वर्ष २५-२६ ला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळांचा परिसर आज पुन्हा एकदा गजबजून गेला. वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी या शाळेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी ने प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर वैभववाडी चे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच गणवेश व बुट वाटप करण्यात आले. तसेच प.पु.श्री.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि अंगणवाडी शाळांना स्वाध्यायमाला संच देण्यात आले. आणि संजय शिंदे यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जि.प.सदस्य सुधिर नकाशे, वैभववाडी माजी सभापती बाप्पी मांजरेकर, नाना बंड , वैभववाडी माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, नाधवडे उपसरपंच प्रफुल कोकाटे, बाबा कोकाटे,नाधवडे तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम इस्वलकर,महेश गोखले, नाधवडे माजी उपसरपंच श्रीरंग पावसकर, सुर्यकांत कांबळे,ग्रा.प सदस्य चिंतामनी शिंदे ,जगनाथ शिंदे, औदुबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर,सचीव दिपक पावसकर, खजिनदार रुपेश कुडतरकर, नाधवडे ग्राम विकास मंडळांचे खजिनदार रविंद्र खांडेकर, सदस्य योगेश शेट्ये, प्रफुल घाडी, योगेश घाडी,संतोष सावंत,कृष्णा नारकर,अंकित शेट्ये, विशाल जठार,विठोबा नारकर,सागर कदम,विशाल पावस्कर,रमाकांंत पांचाळ,वैभव कोकाटे,बाळा जठार,वल्लभ शिंदे, अण्णा शिंगरे,मंगेश शिंगरे, शाळेतील पदवीधर शिक्षक पंढरीनाथ सावंत कोळेकर सर , कुडतडकर मॅडम, अंगणवाडी सेविका शिंदे मॅडम,लेले मॅडम तसेच ग्रामस्थ,पालकवर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!