जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने १८ जून रोजी

बेरोजगार युवक युवती व महिला साठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र शासन उद्योग विभाग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग यांचे वतीने तसेच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दी.१८ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता “बुद्धविहार” पंचशील नगर खारेपाटण येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांसाठी एकदिवसीय मोफत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात स्वयंरोजगार व उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या. १८ ते ५० वयोगटातील किमान सातवी पास बेरोजगार सहभागी होऊ शकतात.तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत देण्यात येणारी कर्ज व सबसिडी योजना तसेच मोफत प्रशिक्षण याविषयी जिल्हा उद्योग केंद्र यांचेकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयक श्रीम सुषमा साखरे यांनी दिली.

तरी या मोफत स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचा खारेपाटण दशक्रोशितील जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्ष सौ सांकिता संतोष पाटणकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!