मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील खड्डा अपघाताना देतोय निमंत्रण

सरपंच संदीप सावंत यांची तातडीने कार्यवाही करण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वागदे गणेश मंदिरासमोर पडलेला खड्डा गंभीर अपघाताला निमंत्रण देत असून त्यावर तातडीने कायमस्वरूपी कार्यवाही करावी अशी मागणी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वागदे गणेश मंदिर समोर रस्त्याखाली ड्रेनेज असून ड्रेनेज साठी वापरलेला सिमेंट पाईप 2 वर्षांपूर्वी फुटला आहे. त्यामुळे रस्ता खचला आहे. खचलेल्या रस्त्यामुळे झालेल्या खड्ड्यात नॅशनल हायवेवर वेगाने जाणारी वाहने आदळून यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. होणारे अपघात हे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होत आहेत.याकडे शाखा अभियंत्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. अपघात कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी रस्ता खचलेल्या ठिकाणी सीमेंट पाईप बदलणे गरजेचे आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सरपंच सावंत यांनी केली आहे.

error: Content is protected !!