अर्जुन रावराणे विद्यालय केवळ शिक्षणचं देत नाही तर सुसंस्कृत विद्यार्थी घडवते- नायब तहसीलदार दिलीप पाटील.

वैभववाडी तालुका विकास मंच यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : काल पासून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थी शैक्षणिक साहित्या अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये. तालुक्यातील सर्व विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशीपासून शिक्षण प्रवाहात सामील व्हावेत या उद्देशाने वैभववाडी तालुका विकास मंच यांच्या वतीने आज अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे तालुक्यातील सर्व शाळांमधील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तहसीलदार दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याधिकारी प्रतिक थोरात, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रोहन रावराणे या सर्वांचे वैभववाडी तालुका विकास मंच यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षणाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. संघर्षातून विद्यार्थी घडत असतो. अर्जुन रावराणे विद्यालयात केवळ शिक्षणाचं नाही तर सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाते असे मत कार्यक्रम प्रसंगी वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी व्यक्त केले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, मुख्याधिकारी प्रतिक थोरात, वैभववाडी तालका विकास मंचचे अध्यक्ष सुरेश पाटील, नवलराज काळे, तालुक्यातील शाळांचे प्रतिनिधी म्हणून राठोड सर या सर्वांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले व वैभववाडी तालुका विकास मंच च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी विकास मंच चे अध्यक्ष सुरेश पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, मुख्याधिकारी प्रतिक थोरात, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रोहन रावराणे, पत्रकार मारुती कांबळे तसेच वैभववाडी तालुका विकास मंच चे उपाध्यक्ष विठ्ठल तळेकर, संतोष पावसकर, सचिव चंद्रकांत रासम, खजिनदार सुभाष करपे,विनायक कोर्लेकर, हिशोब तपासणीस धर्मपाल कांबळे, कार्याध्यक्ष विश्वनाथ पांचाळ, योगेश आंब्रसकर, सदाशिव रावराणे, कायदेशीर सल्लागार रमाकांत पाष्टे, कार्यवाह संदिप नारकर, प्रविण रासम, स्थानिक संपर्क प्रमुख नवलराज काळे तसेच पुंडलिक घाग, अशोक रावराणे, पुरुषोत्तम दळवी, सुरेश आडीवरेकर, निलेश रावराणे, चंद्रकांत मुद्रस, दिलिप सावंत, विष्णू साळुंखे, रविंद्र गावडे , महेश रावराणे तसेच सर्व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्हि.एस.मरळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!