छ.शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचताना शिक्षण सर्वांसाठी खुले केले, हा वारसा आजही प्रेरणादायी ! – डॉ पुरंदर नारे

फोंडाघाट महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी भूषवले. सामाजिक समता, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.

प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या समाजसुधारणा, विशेषतः मागासवर्गीयांसाठी शिक्षण, बोर्डिंग आणि आरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “शाहू महाराजांनी शिक्षणाला सर्वांसाठी खुलं केलं आणि सामाजिक समतेचा पाया रचला. त्यांचा हा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉ. राज तडेराव यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!