मृण्मयी पांचाळ हिने मुखपृष्ठ पेटिंग केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन

कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथील मृण्मयी सदाशिव पांचाळ हिने मुखपृष्ठ पेटिंग केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मृण्मयी सदाशिव पांचाळ ही तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. १२ वी नंतर तीने देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन येथून फाईन आर्ट (ललित कला) पदवी पुर्ण केली आहे. आता ती मूर्ती काम शिकण्यासाठी कोल्हापूर येथे आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ येथे मराठीतून MA करत आहे.

यापुर्वी तिने मुंबई येथे ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मराठी मालिकेसाठी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. रांगोळी, लिखाण, गाणं, वक्तृत्व, वाचन असे छंद जोपासत ती सर्व करत आहे. छ. शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी कोल्हापूर येथे झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के यांच्या उपस्थितीत मृण्मयी सदाशिव पांचाळ, तळेरे हिने पुस्तकाचे मुखपृष्ठ पेंटींग करून प्रदान केले. सोबत मुखपृष्ठ करणारे चित्रकार अन्वर हुसेन उपस्थित होते.

error: Content is protected !!