उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. सीएनजी करिता वाहन चालकांना तासंतास रांगेत रहावे लागत होते. त्यामुळे कणकवलीत सीएनजी पंपाची आवश्यकता होती. नाईक पेट्रोलियमच्या वतीने आज सीएनजी पंप सुरू करण्यात आल्याने सीएनजी वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सीएनजी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी नंदिनी वैभव नाईक, नाईक पेट्रोलियमचे व्यवस्थापक रवी परब, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे सरदार पडवळ,दत्तात्रय शिरसाट,राहुल कुलपे,आकाश शिंदे, नितीन राऊळ, अरुण परब व नाईक पेट्रोलियमचे कर्मचारी उपस्थित होते.











