“जन आरोग्य” मध्ये भाजपाचेच पदाधिकारी का? शहर विकास आघाडीचा सवाल

बांदा (प्रतिनिधी) : बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात गठीत करण्यात आलेल्या केंद्र स्तरीय जन आरोग्य समितीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाच स्थान देण्यात आल्याचा आरोप करत शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांना घेरावो घालत जाब विचारला. त्यावेळी ही समिती स्थापन करण्याचा व त्यात कोणाला समाविष्ट करून घ्यावा याचा सर्वस्वी अधिकार हा जिल्हा आरोग्य अधिकारी व समिती अध्यक्ष यांचा असल्याचे डॉ सारंग यांनी सांगितले.

आज आरोग्य केंद्रात केंद्र स्तरीय जन आरोग्य समितीची पहिली बैठक संपन्न झाली. बैठक संपन्न झाल्यानंतर शहर विकास आघाडीचे सुशांत पांगम, साई काणेकर, अजय महाजन, ओंकार नाडकर्णी, शिंदे शिवसेना युवासेना पदाधिकारी रियाज खान, प्रशांत पांगम, राजेश पावसकर, जहूर शेख, अर्णव स्वार आदिनी याठिकाणी धडक देत जाब विचारला. स्थानिक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून शहरातील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान द्यावे अशी मागणी करण्यात आली. सदरची समिती ही पूर्णपणे भाजपची असल्याचा आरोप यावेळी सुशांत पांगम यांनी केला. शहरात गणेश मंडळ, व्यापारी संघ, सार्वजनिक नवरात्र मंडळ तसेच अनेक सेवाभावी संस्था आहेत. या मंडळाना पत्र देऊन त्यांच्या प्रतिनिधीना समाविष्ठ करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. पंचायत समिती सदस्य या लोकनियुक्त असूनही त्यांचा समितीत उल्लेख हा निमंत्रित सदस्य म्हणून असल्याने याला साई काणेकर यांनी आक्षेप घेतला. यावेळी आपले म्हणणे वरिष्ठना कळविण्याचे आश्वासन डॉ सारंग यांनी दिले

error: Content is protected !!