मांगवली हायस्कूल येथे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ…

वैभववाडी (प्रतिनिधी) : मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय  मांगवली येथे आज छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना कौशल्यदिष्टीत प्रशिक्षण या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे,या संस्थेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना व्हील ऑफ स्किल मार्फत विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण शाळेत वर्षभर देण्यात येणार आहे आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी हे प्रशिक्षण शाळेत होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष महेश संसारे,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र राणे, केंद्रप्रमुख विजय केळकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वैभववाडी चे प्रशिक्षक अमोल राणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भोसले माजी मुख्याध्यापक एस.डी. पाटील, भोसले, तसेच कॉज टू कनेक्ट फाउंडेशन या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा  समन्वयक सुचित भोसले वैभववाडी तालुका समन्वयक कमलेश बिडये, वैभववाडी निदेशक विकी कासले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुचित भोसले यांनी व्हील ऑफ स्किल मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती दिली  संस्थेमार्फत सिंधुदुर्ग मध्ये सध्या 18 शाळेतून हा उपक्रम सुरू आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषी, इंजीनियरिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशन, पशुपालन, गवंडी काम इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे सांगितले.त्याचबरोबर आयटीआयचे प्रशिक्षक अमोल राणे सर यांनी विद्यार्थ्यांना आयटीआय मार्फत सुरू असलेल्या विविध योजना व कोर्स याबाबत माहिती दिली. तर केंद्रप्रमुख केळकर यांनी अशा उपक्रमांची गरज आहे. सदरची गरज ही संस्था व शाळा पूर्ण करत असल्याने अतिशय समाधान वाटते. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी केंद्रप्रमुख म्हणून नेहमी तुमच्या सोबत असेल असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष महेश संसारे यांनी आधुनिक जीवनकाळात या उपक्रमाची का गरज आहे हे मनोगतात व्यक्त केले व त्यानंतर मुख्याध्यापिका भोसले यांनी आभार मानले. तसेच व्हील ऑफ स्किल या उपक्रम गाडीचे उद्घाटन केंद्रप्रमुख केळकर व आयटीआय चे प्रशिक्षक अमोल राणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची लिपिक तथा संस्थेचे संचालक शरद कांबळे यांनी केले.

error: Content is protected !!