पालकमंत्री नितेश यांच्या संकल्पनेतून घोणसरीतील विद्यार्थिनींनी पाहिला केरला २ सिनेमा

नेहा मीहीर मराठे यांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून  केरला स्टोरी २ हा चित्रपट फडणीस हायस्कुल घोणसरी  मधील आठवी व नववीतील विद्यार्थिनींना मोफत दाखवण्यात आला. यासाठी घोणसरी गावातील सौ. नेहा मिहीर मराठे यांनी आयोजन करत मेहनत घेतली. किशोरवयीन शालेय विद्यार्थिनींमध्येसुद्धा लव्ह जिहाद सारख्या भीषण संकटाबद्दल जनजागृती व्हावी, हिंदू धर्मीय मुलींचे आयुष्य भरकटू नये  या उद्देशाने

पालकमंत्री नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 सिनेमा किशोरवयीन विद्यार्थीनी, कॉलेजमधील युवतींना दाखवण्याची संकल्पना आहे.केरला स्टोरी 2 यासारख्या चित्रपटांमधून समाजात घडणाऱ्या विविध घटनांबाबत विद्यार्थिनींमध्ये योग्य वेळी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या मुली उद्या शिक्षण व नोकरीसाठी घराबाहेर पडतील, त्यामुळे त्यांना अशा गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे. योग्य माहिती व जागरूकतेमुळे मुली सजग, सावध राहतील आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडणार नाहीत अशी प्रतिक्रिया सौ. नेहा मराठे  यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!