कणकवली नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्या हस्ते होणार पूजा
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी 8.30 वा नायब तहसीलदार कणकवली मंगेश यादव यांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजल्यापासून विविध भजन मंडळे आपली भजन सेवा सादर करणार आहेत. यामध्ये पळसंब, गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ आडवली, गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ रामगड, महापूरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक साटमवाडी, मांडवीर प्रासादिक भजन मंडळ पाणलोस पश्चिम अशा पळसंब पंचक्रोशीतील भजनी मंडळांची सुस्वर भजने आयोजित केलेली आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट पळसंब वरचीवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.













