त्रिंबक येथे वृक्षारोपण महोत्सव अभियान संपन्न…!

ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक- मुंबई यांचे आयोजन

त्रिंबक गावच्या विकासासाठी जागृत उन्नती मंडळ सदैव तत्पर – दत्ता पवार

आचरा (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्ग सुंदर त्रिंबक परिवर्तन अभियान या हेतूने ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण अभियान २ चा रविवार २९ जून रोजी सकाळी त्रिंबक सापळा येथून आचरा पोलिस कर्मचारी मिनाक्षी देसाई, सरपंच किशोर त्रिंबककर, जागृत मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गाळाणे भरलेल्या ओढ्याचे पुनरुज्जीवन असो वा हरित क्रांतीसाठी २०२४ मधले आणि २०२५ मधली वृक्षारोपण महोत्सव अभियान असोत त्रिंबक गावच्या एकोप्याचे दर्शन घडते. वड, पिंपळ, बदाम, गुलमोहर, आंबा अशा नानाविध २०० वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.

गावाच्या विकासासाठी जागृत उन्नती मंडळ तत्पर – दत्ता पवार

जागृत उन्नती मंडळ गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठीच स्थापण केलेले असून यासाठी आपण सदैव तत्पर आहोत भविष्यात विविधांगी उपक्रम राबवण्याची ग्वाही जागृत उन्नती मंडळ त्रिंबक-मुंबई दत्ता पवार यांनी दिली. गावातील घराची पडझड झालेल्या जयश्री कदम यांना मंडळाकडून आर्थिक मदत करण्यात आली. प्रमुख पाहुणे आचरा पोलिस कर्मचारी मिनाक्षी देसाई यांनी उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या, जनता विद्या मंदिर त्रिंबक मुख्याध्यापक प्रविण घाडीगावकर, माजी सभापती अशोक बागवे, सरपंच किशोर त्रिंबककर यांनी आपले अभिनव विचार मांडले.

विशेष प्राविण्य प्राप्त दहावी गुणवंतांचा गौरव

इयत्ता दहावी विशेष प्राविण्य प्राप्त कु. कोमल संतोष अपराज, कु. शर्वरी प्रशांत परब, कु. केतकी प्रसाद घाडीगांवकर, कु. प्रांजल बाळकृष्ण त्रिंबककर, कु. हर्षदा प्रसाद घाडीगांवकर या पहिल्या पाच क्रमांकांने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच सुचिता घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य आशिष बागवे, नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सागर चव्हाण, सपना तेली, जागृत उन्नती मंडळ त्रिंबक मुंबईचे कार्याध्यक्ष चेतन साटम, कार्यवाह अरविंद कदम, खजिनदार संतोष त्रिंबककर, अनिल कदम, सुनील जाधव, ग्रामीण शाखेचे अध्यक्ष बाळा बागवे, सचिव पुजा सुतार, खजिनदार विलास त्रिंबककर, उपाध्यक्ष संतोष घाडीगांवकर, सहसचिव सिताराम (बाबू) सकपाळ, प्रदीप दामले, सुरेंद्र (अन्ना) सकपाळ, अनिल लब्दे, अशोक बागवे, श्रीकांत बागवे, छाया साटम, शेखर सुतार, रविंद्र मेस्त्री, सुभाष मेस्त्री, सारंगी चव्हाण, गणेश गोसावी, सीमा घाडीगावकर, अशोक कदम, तुषार चिंदरकर, राकेश घाडीगावकर, अर्चना त्रिंबककर, ऋतुजा सुतार, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय मेहेंदळे यांनी तर सूत्रसंचालन अरविंद कदम यांनी केले.

error: Content is protected !!