वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेचा एन. सी. सी. विभागाचा दहा दिवसांचा कॅम्प यशस्वी संपन्न

ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे विद्यार्थ्यांनी गिरवले सैनिकी प्रशिक्षणाचे धडे

वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी प्रशालेत देशभक्ती आणि देशप्रेमाचे शिस्तबद्ध शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनीचा एन. सी. सी. विभाग कठीबद्ध आहे या विभागाचे नेतृत्व थर्ड ऑफिसर संदेश तुळसणकर सर जाणिवपूर्वक करत आहेत. प्रशालेतील एनसीसी विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा कॅम्प नुकताच सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे संपन्न झाला या दहा दिवसामध्ये एनसीसी विभागातून प्रशालेचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते या दहा दिवसात सर्व प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण आणि देशप्रमाचे शिक्षण देवून विद्यार्थ्यांची मने देशप्रेमाने भारावून गेली एकता ‘समता, बंधुप्रेम व देशप्रेम दृढ करणारे शिक्षण या कॅम्पच्या माध्यमातून दिले गेले यावेळी प्रशालेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनींनी नवव्या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून कलाविष्कार दाखवून नावलौकिक मिळविला .

वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थांना मिळले तसेच प्रशालेच्या एनसीसी विभागाचे प्रमुख तुळसणकर यांचे मार्गदर्शनही लाभले या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस. नादकर सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले.

error: Content is protected !!