२००५ मधील नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये २००५ मध्ये भरती झालेल्या ग्रामसेवकांना आचार संहितेमूळे जुनी पेन्शन लागू झालेली नव्हती. त्यामूळे २००५ ते २०२४ असा वीस वर्षे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE136 मार्फत यासाठी लढा देण्यात आला होता. दिनांक ०९/१०/२०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय करुन २००५ मधील नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सिंधुदुर्गने दिनांक ०७/०७/२०२५ रोजी याबाबत चे आदेश काढून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४७ ग्रामसेवकांना जूनी पेन्शन योजना लागू केली होती. त्यामूळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE136 जिल्हा सिंधुदुर्गकडून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) विशाल तनपूरे यांची भेट घेवून त्यांचे जाहिर आभार मानन्यात आले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, रवींद्र खेबूडकर यांनी स्वतः सर्व ग्रामसेवकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. गुरुपौर्णिमा असल्याने सर्व ग्रामसेवकांना यांनी कृतज्ञ भावनेने मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना वंदन केले आणि जुनी पेन्शन लागू केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE 136 सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम, सरचिटणीस संतोष पालव, महिला उपाध्यक्ष भक्ती शेटकर, वैभव ठाकूर, शशिकांत तांबे, महानंदा वराडकर, संगिता राणे, महादेव वालावलकर, सतिश साळगांवकर, हनुमंत तेर्से, सुहास पाटील, अर्चना लाड, महेश कुबल, पांडूरंग शेटगे, रघुनाथ भोगटे, सोनिया पांजरी, दत्तात्रय तळवडेकर, आत्माराम जोशी, अपर्णा पाटील, युवराज चव्हाण, हर्षद मसुरकर, मनिषा गोसावी, नरेश एडगे, शालिनी कोकरे, प्रमोद निकम, अमित कांबळी, शुभांगी देवरुखकर, उमर मुल्लानी, अनिला घुगरे, रेश्मा ठाकूर, इत्यादी बहुसंख्य ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!