रोटरी पेशंट बँक चे देवगड येथे उदघाटन संपन्न
देवगड (प्रतिनिधी) : कै.रो. संजय धुरी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी पेशंट बैंक एक हात मानवतेचा……..! या पेशंट बँक चे उदघाटन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड तर्फे देवगड येथे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रोटे अरुण भंडारे यांच्या शुभहस्ते माजी डिस्ट्रिकत गव्हर्नर रोटे. संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
यावेळी अस्सीस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड चेवप्रेसिडेंट – रो गौरव पारकर, सेक्रेटरी- रो अनुश्री पारकर, रो मनस्वि घारे – हनिफ, रो- श्रीपाद पारकर, खजिनदार – दयानंद पाटील, रो विजय बांदिवडेकर , रो अनिल कोरगावकर, रो अनिकेत बांदिवडेकर, रोटे प्रविण पोकळे, रो रमाकांत आचरेकर, रो नरेश डामरी, रो श्यामल पोकळे, रो मनीषा डामरी, रो एकनाथ तेली, रो अनिल गांधी उपस्थित होते.












