संकटसमयी 112 नंबरवर पोलिसांना कॉल करा

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे नागरिकांना आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात झालेल्या ज्वेलर्स दुकानातील चोरीच्या संदर्भाने नागरिकांनी संकटसमयी 112 नंबर वर कॉल करावा असे आवाहन कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी नागरिकांना केले आहे. चोरी अथवा अन्य काही अनुचित घटना घडत असल्याचा संशय आल्यास अथवा एखादा अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत असल्यास त्वरित 112 या नंबरवर कॉल करावा. 112 नंबर हा पोलीस खात्याचा नागरिकांसाठी अतिशीघ्र प्रतिसाद देण्यासाठी वापरला जातो. समाजात आपल्या आजूबाजूला कुठलीही अनुचित घटना घडल्याचे किंवा घडत असल्याचे समजताच नागरिकांनी सतर्क राहून 112 नंबर वर कॉल करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे. कणकवली शहरातील सना कॉम्प्लेक्स मधीलभालचंद्र ज्वेलर्स मध्ये मध्यरात्री 2 वाजून 42 मिनिटांनी चोरी केली. मात्र बिल्डिंगमधील नागरिकांनी तासाभराने ज्वेलर्स मालकाला कळवले. या चोरीच्या घटनेत जर 112 नंबरवर पोलिसांना कॉल केला असता तर लागलीच पोलीस घटनास्थळी पोचले असते. त्यामुळे जर अशा घटना घडत असल्याचा संशय आला तरी 112 नंबरवर कॉल करावा असे आवाहन पीआय जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!